सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत   

सिंगापूर :  खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीत भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत मजल मारली. 
त्यांनी शुक्रवारी जागतिक क्रमांकावर अव्वल स्थानावर असणार्‍या मलेशियाच्या गोह फी आणि नूर इज्जुदीन बिन महमद रुमसानी यांचा २१-१७, २१-१५ असा पराभव केला. भारतीय बॅडमिंटनपटूंनी हा सामना ३९ मीनिटात जिंकला.त्याआधी झालेल्या सामन्यात इंडोनिशियाच्या साबर कार्यमन गुटामा आणि मोह रजा पहलेवी यांच्या जोडीला २१-१९,२१-१६,२१-१९ असे हरविले होते. हा सामना भारताच्या बॅडमिंटनपटूंनी १ तास १४ मीनिटात जिंकला होता. 

Related Articles